बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा

नवी दिल्ली | आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी केंद्र आणि राज्य सरकार उत्तर प्रदेशमध्ये जोर लाऊन काम करताना पहायला मिळत आहेत. अशातच उत्तर प्रदेश राज्याला कायदा आणि सुव्यवस्थेत अव्वल स्थानी नेलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी योगी सरकारचं कौतुक केलं आहे. राज्य न्यायवैद्यक संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.

2017 पुर्वी राज्यात सर्वत्र गुन्हेगारी पसरलेली होती. इतकंच काय तर महिलांंवर अन्याय, कायदा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले होते पण आमची सत्ता आल्यापासुन योगीजींच्या नेतृत्त्वाच सुरक्षित उत्तर प्रदेश घडत असल्याचं अमित शहा म्हणाले. गुंडाराज, महिलांवर होणारे अत्याचार, जमिनीचे गैरव्यवहार आणि लुटमार हे घडत असताना भयमुक्त उत्तर प्रदेशची कल्पना कोणी ही केली नव्हती पण 2017 पासुन आमच्या सरकारने हे करून दाखवलं, असंही शहा यांनी म्हटलं आहे,

उत्तर प्रदेशचं नाव घेतल की आपल्या समोर दिवसा होणारा गोऴीबार, भयभीत चेहरे आणि बडेबडे बाहुबली हे दिसायचे. परंतू योगीजींच्या सरकारने अवघ्या 4 वर्षात उत्तर प्रदेशला देशातील एक विकसित राज्य बनवल्याचं म्हणत शहांनी कौतुक केलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या कोणत्याही भागात गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त विकास दिसेल. मोठ्या प्रमाणात सुधारत असलेली आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था ही सर्व योगींच्या सर्व सहकाऱ्यांची मेहनत असल्याचंही शहा म्हणाले.

थोडक्यात बातम्या

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More