बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. भाजपला दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. भाजपला बंगालमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर अमित शहांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण बंगालच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो, असं म्हणत अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव स्वीकारला आहे.

भाजप एका शक्तीशाली विरोधीपक्षाच्या स्वरुपात बंगालमधील जनतेचे अधिकार आणि राज्याच्या प्रगतीसाठी नेहमीच आवाज उचलत राहील. भाजप बंगालच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असं अमित शहा म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजप जनतेची सेवा करत राहील. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकत्यांचे आभार मानत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

वयाच्या 25 व्या वर्षी खासदार झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचं निधन!

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

नितेश राणेंची महाविकास आघाडीच्या आमदारांना खुली ऑफर, म्हणाले ‘येणारा धोका समजा’

संजय राऊत म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना- देवेंद्र फडणवीस

‘क्रूर महिला पुन्हा सत्तेत आली’; ‘या’ भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More