“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात देशभर नसती”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आज छत्रपती शिवाजी महाराजांची(Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती असल्यानं सगळीकडं जल्लोष आणि उत्साह पहायला मिळत आहे. अशातच आंबेगाब बुद्रुक येथे उभारलेल्या ‘शिवसृष्टी’ च्या ‘सरकारवाडा’ या पहिल्या चरणाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं भारताचे गृहमंत्री अमित शहा हजर होते. यावेळी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना शहांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

देशाच्या कानाकोपऱ्याच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेनीं (Shivshahir Babasaheb Purandare) केलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात देशभर नसती. असं वक्तव्य शहानीं केलं आहे.

पुरंदरे यांनी आपलं आयुष्य जगभर फिरुन महाराजांबाबतचं अनेक दस्तेवज, वस्तू गोळा केल्या. त्या वस्तू गोळा करुन इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचविण्याचं काम त्यांनी केलं आहे. पुरंदरे यांनी महाराजांना जगभरात पोहचवण्याचं जे काम केलं आहे ते देशासाठी उपकार आहेत असंही शहा म्हणाले.

महाराजांच्या जीवनातील उत्तुंग शिखरे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पुरंदरेंनी केलं आहे. असं मत अमित शहा(Amit Shah) यांनी कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केलं. दरम्यान यावेळी शहानीं महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलताना एका तासांपेक्षा जास्त वेळ घेतला.

महत्त्वाच्या बातम्या