संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. संजय राऊंतावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.
ईडीने केलेल्या कारवाईचा मुद्दा संजय राऊतांनी थेट राज्यसभेत उपस्थित केला. केंद्राकडून कायद्याचा दुरूपयोग न करण्याचं आश्वासन देणारे गृहमंत्री प्रश्नांची उत्तरं डोळ्यात डोळे घालून देणार का?, असा सवाल उपस्थित करत राऊतांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊतांच्या या टीकेला अमित शहांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप करणाऱ्यांनी डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवली पाहिजे, असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे. तर आमच्या मनात काही चोर नाही. आम्ही तेच करतो ज्यासाठी आमची आत्मा आम्हाला प्रोत्साहन देते, असं प्रत्युत्तर शहा यांनी दिलं आहे.
दरम्यान, राज्यसभेत गुन्हेगारांचा डिजिटल डेटा गोळा करण्यासंदर्भातील विधेयकावर चर्चा सुरू होती. याबद्दल बोलताना संजय राऊतांनी अमित शहांवर टीका केली होती. तर त्यावर डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारा, असा पलटवार अमित शहांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळेच…”
“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “
कोरोनाच्या XE व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांचा धक्कादायक दावा, म्हणाले…
पुतिन यांच्या मुलींविरोधात अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
काळजी घ्या! महाराष्ट्रासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार
Comments are closed.