महाराष्ट्र मुंबई

पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

मुंबई | शिवसेनेशी युती झाली नाही तर आम्हाला काहीच फरक पडत नाही, असं म्हणणाऱ्या भाजपने पुन्हा युतीसाठी हात पुढे सरसावला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

युतीबाबत निर्णय लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून पुढील निर्णय घेता येतील, असं शहा यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं कळतंय. 

नुकत्याच जालना येथे झालेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदूत्वासाठी शिवसेनेशी युती करायची असल्याचं स्पष्ट केलं होतं, मात्र आम्ही त्यासाठी लाचारी पत्करणार नाही, असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बघता भाजपकडून युतीची चर्चा अजूनही चालू असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

-महाआघाडीची सत्ता आल्यास दररोज पंतप्रधान बदलला जाईल- अमित शहा

-“राहुल गांधी देशातील पुरुषांना फ्री सेक्सचंही आश्वासन देतील”

-मनसे-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, वाचा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या