अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांच्या साखरपुड्याचे फोटो

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजिव आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा आज संपन्न झाला. महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

 

साखरपुडा समारंभानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्याला माझी नवीन बॉस असं कॅप्शन दिलंय.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांची जुनी ओळख आहे. राज ठाकरेंची मुलगी उर्वशी हिची मिताली मैत्रिण होती. अमित यांच्यासोबतच्या ओळखीनंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

राज ठाकरेंसह बोरुडे कुटुंबियांनीही दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तसेच लग्नालाही समंती दिली. 

अमित आणि मितालीचा साखरपुडा समारंभ खासगी ठेवण्यात आला होता. जवळचे नातेवाईक आणि मित्रांनाच या सोहळ्याचं निमंत्रण होतं. 

मिताली आणि अमितच्या साखरपुड्यासाठी खास पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या.