महाराष्ट्र मुंबई

अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईच्या समस्यांवर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं होतं.

गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची रेल्वे व्यवस्थापकांनी पवानगी दिली आहे. अमित ठाकरेंच्या मागणीवरुन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरोदार महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळतं नसल्याने अमित ठाकरेंनी अखेर मनसेच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं. अमित ठाकरेंनी मुंबईकरांसंबंधी महत्वाचे मुद्दे मांडले.

दरम्यान, रेल्वेमध्ये एकही महिला सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरेंनी महाव्यवस्थापकांच्या नजरेत आणून दिलं होतं. सुरक्षेसाठी फक्त सीसीटीव्हीच नाही तर सुरक्षारक्षकही वाढवावे, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के! शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

-काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना उचलायचाय विखेंना हरवण्याचा विडा!

-‘सीसीडी’चे मालक बेपत्ता; सापडलं भावनिक पत्र

-पुलवामा हल्ल्याच्यावेळी मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त???

-गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाआधीच आमदार मंदा म्हात्रे आक्रमक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या