सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Amit Thackeray | मुंबईमधील माहीम मतदारसंघावर यावेळी सर्वांची नजर असणार आहे. येथे यंदा तिरंगी लढत होणार आहे. माहीममधून मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) निवडणुकीच्या रिंगणात आहे. आज राज्यभरात मतदान पार पडते आहे.

आज सकाळी 9 वाजेपर्यंत माहीम विधानसभा मतदारसंघात 8.14 टक्के मतदान झालं. मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी देखील मतदान केलं.यावेळी अमित ठाकरेंनी माहीम-दादरमधील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, असं आवाहन देखील केलं.

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

यावेळी अमित ठाकरे यांनी सत्ता स्थापनेबाबतही मोठा दावा केला. मी दाव्याने सांगतो, मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी डोअर टू डोअर प्रचार केलाय. मला जे करायचं आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवलं आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मतदान करण्यापूर्वी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक मंदीरात जाणून दर्शन घेतले. यावेळी दोघांचीही भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन देखील केलं आणि एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. माहीम येथे आता कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

माहीममध्ये तिरंगी लढत

प्रचारकाळात मनसे आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला होता. मात्र आज दोन्ही उमेदवारांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर परस्परांशी हस्तांदोलन केलं. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी देखील सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला.

“दादरचे मतदार हे विचारपूर्वक मतदान करतात. इथे कोणाच्या ओघात, प्रेमाखातर जात नाही. जो खरोखर काम करतो, जो उपलब्ध असतो, लोकांची सेवा करतो त्याला लोक निवडतात.”, असं महेश सावंत म्हणाले आहेत.

News Title :  Amit Thackeray big statement on power formation

महत्वाच्या बातम्या –

मतदानाच्या दिवशी जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना मोठं आवाहन; म्हणाले..

‘विनोद तावडे निर्दोष, त्यांच्याकडे कोणताही पैसा सापडला नाही..’; फडणवीस स्पष्टच बोलले

विनोद तावडेंच्या डायरी संबंधित नव्या दाव्यानं राजकारणात पुन्हा खळबळ!

शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!

ऐन निवडणुकीत भाजपचा सुप्रिया सुळेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकारणात खळबळ