“..तर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू”; नीट परीक्षेतील गोंधळावरून मनसेचा गंभीर इशारा

Amit Thackeray | देशभरात सध्या नीट परीक्षेवरून गोंधळ सुरू आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जात आहे. नीट परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थी आणि पालक यांनी संताप व्यक्त केला आहे. परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे.

या प्रकरणाची आता मनसेने देखील दखल घेतली आहे. मनसे अध्य राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी या प्रकरणी फेसबुक एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.

अमित ठाकरे यांची पोस्ट

‘नीट’ची परीक्षा तरी नीट घ्या! हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? 67 मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? ‘नीट’ ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का?, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने… हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नव्हे! पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. अशी टीका अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केली.

“..तर मनसे विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल”

‘नीट’ परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने तात्काळ या गंभीर परिस्थितीचा तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पालक आणि विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाच्या गरिमेशी खेळ करणं, हे कदापिही सहन केलं जाणार नाही, असा इशाराच यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दिलाय.

News Title : AMit Thackeray Facebook Post on NEET Exam

महत्त्वाच्या बातम्या

“लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली”

अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना सणसणीत टोला, पाहा Video

“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन!