बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई  | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांना दोन-तीन दिवसांपासून सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांनी काल चाचणी करण्यात केली असता त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटव्ह आला आहे.

अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर पुढील 14 दिवस तिथेच उपचार करण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे. तर अमित ठाकरेंनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.

अमित ठाकरेेंना सर्दी आणि ताप जाणवत असल्याने त्यांची काल कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. अमित ठाकरे पॉझिटिव्ह आले असले तरी राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षण नाहीत. त्यासोबतच राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतरांची चाचणीही निगेटिव्ह आल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, काही दिवसांआधी अमित ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. माझी एक सर्वांना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे, आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर ‘कृपया’ मरणाच्या बातम्या, स्मशानातील फोटो, व्हिडीओ, शवागरातील मृतदेहांचा खच असलेले फोटो, व्हिडीओ कृपा करून शेअर करू नका ते तुमच्याकडेच ठेवा किंवा डिलीट करा. पण ते व्हायरल करून लोकांच्या मनातील भीती वाढवू नका, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

कामावरुन काढून टाकायला सुरुवात; पुण्यातील ‘या’ बड्या कंपनीनं 1419 कामगारांना काढलं!

पुण्यातील तरूणाला मध्यस्थी करणं पडलं महागात, भांडण मिटवली म्हणून तलवारीने केले सपासप वार

कोथरुडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रियकराने तरुणी आणि तिच्या मित्रासोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

चाहता फोटो काढायला आला अन् किस करुन गेला, अभिनेत्री झाली हैराण

मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More