बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या- अमित ठाकरे

मुंबई | राज्य सरकारने 14 मार्चला असलेली ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. विरोधी पक्षानेही हे यावरून सरकारवर टीकेचेा बाण सोडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 14 मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं भावविश्व उद्ध्वस्त झालं असल्याचं अमित ठाकरेेंनी म्हटलं आहे.

एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले असून पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल अमित ठाकरेंनी राज्य सरकारला केली आहे.

माझी राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर ठेवून आपला निर्णय मागे घ्यावा. परीक्षा ठरलेल्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजीच घ्यावी, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी वचन देतो….’; पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

व्हिडीओ शेअर करत प्रियंका चोप्राने दिली गुड न्यूज!

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात वडेट्टीवारांच्या खात्याचा हात पण मंत्री म्हणतात, मला विचारलंच नाही!

विजय वडेट्टीवर यांच्या खात्यानं दिला MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला

विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे- देेवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More