बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगितलं जातंय; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र लिहिलं आहे.

आमच्याकडे बेड नाहीत, दुसऱ्या रुग्णालयात जा म्हणून नागरिकांना काढून दिलं जात आहे. त्यावर उपाय योजना कराव्यात. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रत्येक रुग्णालयाची ऑनलाईन माहिती उपलब्ध व्हावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

महाराष्ट्र शासन कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करत आहे. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव सर्व सामान्य व्यक्तींना झाला, तर त्यांनी काय करावं यावर काम करण्याची गरज आहे. तुम्ही यासाठी हेल्पलाईन सुरु केली आहे याची मला पूर्णपणे माहिती आहे. तरिही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावे, कोठे जावे हे कळत नाही, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

उपचारादरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्व रुग्णालयाची माहिती अ‌ॅपवर उपलब्ध करावी, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

“काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत”

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More