Top News नागपूर महाराष्ट्र राजकारण

आता मनसेच्या अमित ठाकरेंचीही शिवसेनेवर टीका, म्हणाले…

Photo Credit- Facebook/ Uddhav Thackeray & Amit Thackeray

नागपूर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिवसेना हिंदुत्वापासून दूरावली आहे, आणि शिवजयंतीला परवानगी नाकारून त्यांनी हे सिद्ध केलं आणि या सर्व गोष्टींना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सर्व महापुरुषांचे जन्म आपण उत्सवाप्रमाने साजरे केले पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकारने शिवजयंतीला आणि मिरवणुकीला परवानगी देणं गरजेचं आहे. सर्व जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे. युवा वर्ग, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि इतर वर्ग रस्त्यावर उतरले आहेत, असं मतही अमित ठाकरेंनी व्यक्त केलं.

पक्षाने टाकलेल्या जबाबदारीचं भान मी कायम ठेवेल आणि योग्यरीत्या पक्ष मोठा करण्यासाठी आणि जन-सामान्यांसाठी लढत राहील. बाकीचे पक्ष काय करतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही मी तो विचार करत नाही. मला फक्त माझी जनता आणि माझा पक्ष महत्वाचा वाटतो, असं अमित ठाकरे म्हणाले.

आपण नागरिकांचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ ठरत आहोत त्यामुळे त्यावर भर देणं गरजेचं आहे, रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न तरुणांना भेडसावत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने काम करणं गरजेचं असल्याचंही अमित ठाकरे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले’; दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी संतापल्या

140 किलो वजनाचा गोलंदाज सगळ्या बांगलादेशला पुरुन उरला, लावला धक्कादायक निकाल!

मालक दिलदार, कुत्रा मालामाल; बनला एका रात्रीत 36 कोटीचा मालक

पी. बी. सावंत कोण होते?, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्द

मराठी माध्यमातून शिक्षण, बीएमसीनं नोकरी नाकारली!; शिक्षक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या