लातूर | कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी आज दिली. ते लातूरमध्ये बोलत होते.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ प्रादुर्भावास जागतिक आजार घोषित केला आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे नि:शुल्क करण्यात आले आहेत.
कोविड -१९ ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-१९ ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात असा अनुभव आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-१९ ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
#कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये #coronavirus च्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय- वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh यांची माहिती pic.twitter.com/A4ziNRxWd0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 24, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ
कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी
Comments are closed.