बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

नवी दिल्ली | ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या बेगम फारूख जाफर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांचं निधन झालं असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना लखनऊच्या सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाची लेखिका जुही चतुर्वेदी हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत बेगम फारूख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

फारुख जाफर यांनी रेडीयो निवेदीका म्हणून करिअरच्या सुरूवातीला काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटात काम करायला सुरूवात केली. ‘उमराव जान’ या चित्रपटात रेखाच्या आईची भुमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘पीपली लाईव्ह’, ‘स्वदेश’, ‘सुलतान’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

मागच्या वर्षी आलेला ‘गुलाबो सिताबो’ हा बेगम फारूख यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. यामध्ये त्यांनी फातिमा बेगम ही भूमिका साकारली होती. लखनऊ येथील गोमतीनगरच्या निवासस्थानी बेगम फारूख यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Juhi Chaturvedi (@juhic3)

थोडक्यात बातम्या-

‘वसुली सरकार भरती काढत नाही आणि काढली तर सावळा गोंधळ घालतं’; पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

‘त्या’ लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय?, नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलं

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More