बिग बी आणि माधुरी दीक्षित सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकार

मुंबई | ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’ या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात सगळ्या कलाकारांना मागे टाकत बिग बी अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकवला आहे.

कलाकारांचं सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातलं वर्तन, सहकलाकारांबाबत असलेला त्यांचा दृष्टीकोन,  त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा , सोशल नेटवर्किगवरचा त्यांचा वावर असे अनेक मुद्दे घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

माधुरी दीक्षित पाठोपाठ प्रियंका, दीपिका, सोनम यांना स्थान मिळवलं आहे तर  बिग बीनंतर शाहरुख खान, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे अभिनेते आहेत.