बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमिताभ बच्चनही आयसोलेशनमध्ये, हातावर BMCचा ‘शिक्का’

मुंबई | कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत असताना सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच या व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचं चित्र आहे. आता महानायक अमिताभ बच्चन यांनीही स्वत:ला आयसोलेशनचा मार्ग पत्करला आहे.

जे लोक क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांच्या हातावर बीएमसीकडून असा स्टॅम्प लावण्यात येत आहेत. आता अमिताभ काही दिवस घरात बंद असतील. 31 मार्चपर्यंत कोरानापासून बचावासाठी ते घरात राहतील.

अमिताभ यांनी ट्विटरवर आपल्या हाताचा एक फोटो शेअर केला. यात एक स्टॅम्प निळ्या शाईचा शिक्का लागलेला आहे. या स्टॅम्पमध्ये आयसोलेशन अर्थात क्वारंटाईनबद्दल लिहिलं आहे.

दरम्यान, 31 मार्चपर्यंत कोरानापासून बचावासाठी ते घरात राहतील. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये अन्य लोकांनाही काळजी घेण्याचे व सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“गोगोईंकडून न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या तत्वांशी तडजोड”

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बुधवार पेठेतील ‘तो’ व्यवसायही बंद!

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत ते कौतुकास्पद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More