अमिताभ बच्चन यांचे सून ऐश्वर्याशी अजूनही पटत नाही?; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

Amitabh Bachchan-Aishwarya Rai | बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काहीतरी बिनसल्याचे मागे म्हटले गेले. ऐश्वर्याला सासू जया आणि नणंद श्वेता बच्चन यांच्यासोबतही खूपच कमी बघितलं जातं. त्यांच्यात काहीतरी वाद असल्याचंही मागे म्हटलं गेलं.

इतकंच काय तर, ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळं होणार, ती अभिषेकला घटस्फोट देणार इथपर्यंत या चर्चा झाल्या. दुसरीकडे ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून आली. त्यामुळे या सर्व चर्चा तेव्हा फोल ठरल्या होत्या. अशात बीग-बी अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने पुन्हा एकदा बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे.

अमिताभ बच्चन यांचे सून ऐश्वर्याशी मतभेद?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘रावण’ चित्रपटाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी अमिताभ बच्चन यांनी एक खास पोस्ट शेअर करून त्यांचे अभिनंदन केले. मात्र, या पोस्टमध्ये त्यांनी सून ऐश्वर्या हीचं कुठेही नाव घेतलं नाही. यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लेक अभिषेकचे भरभरून कौतुक केले. पण त्यांनी सून ऐश्वर्याबद्दल साधा एक शब्दही लिहिला नाही. त्यामुळे नेटकरी यावर नाराजी व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या (Amitabh Bachchan-Aishwarya Rai ) यांच्यात पुन्हा एकदा मतभेद असल्याच्या चर्चा आता होत आहेत.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “अभिषेकचा एक अविस्मरणीय परफॉर्मन्स.. तुमच्या इतर सर्व चित्रपटांपेक्षा वेगळा.. आणि हीच कलाकाराची खरी किंमत आहे! खूप सारं प्रेम.”, बच्चन यांची ही पोस्ट आता वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट शेअर करताच लोकांनी त्यांची सून ऐश्वर्या रायबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. अमिताभ यांनी त्यांच्या सुनेकडे दुर्लक्ष केल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर चाहते अनेक कमेंट करत आहेत. ‘ऐश्वर्यानेही चित्रपटात जबरदस्त काम केले, पण तुम्ही तिचे कौतुक का केले नाही?’, असं एक यूझर म्हणाला आहे.त्यामुळे (Amitabh Bachchan-Aishwarya Rai )  पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि तिचं कुटुंब चर्चेत आलं आहे.

News Title-  Amitabh Bachchan-Aishwarya Rai   

महत्वाच्या बातम्या- 

“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”; पवारांनी मोदींना डिवचलं

केंद्र सरकार पंकजा मुंडे संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय घेणार!

पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय

अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..