Top News महाराष्ट्र मुंबई

“आता का ट्विट करत नाहीत?, यांच्या सिनेमांचं शुटिंग होऊ देणार नाही”

मुंबई | बॉलिवूडचे बादशाह अभिनेते अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग महाराष्ट्र राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू घेतली होती. परंतू आता ते गप्प का आहेत?, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करत त्यांच्यावर फुलाचा वर्षाव केला. त्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लाखनी ते भंडारा ट्रॅक्टरसह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, देशात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरुन कोणी बोलायला तयार नाही. काँग्रेस सरकारच्या काळात टीव-टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का?, असा संतप्त सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

गजानन मारणेला आणखी मोठा धक्का, पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

बबब… छप्पर फाडके पैसा!!! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला लागली जबरदस्त बोली

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

पूजाला होता ‘हा’ आजार, आई-वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या