..अन् अमिताभ बच्चन यांनी थेट हाथच जोडले; नेमकं असं काय घडलं?

Amitabh Bachchan | बीग-बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मागच्या वर्षी कौन बनेगा करोडपती या शोला अलविदा केला होता. मात्र, लोकांच्या मागणीमुळे हा शो पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. कौन बनेगा करोडपतीचा हा 16 वा सीजन आहे. याचा पहिला एपिसोड प्रदर्शित देखील झाला आहे. सोमवारी रात्री 9 वाजता याचा पहिला एपिसोड दाखवण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे भावुक झाल्याचे दिसून आले.

अमिताभ बच्चन झाले भावुक

अमिताभ बच्चन भावुक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी अमिताभ बच्चन केबीसीला सपोर्ट केल्याबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार मानताना दिसून आले. “मी नव्या सीजनला सुरूवात करत आहे. पण माझे शब्द कमी पडत आहेत. कारण, असा कोणताच शब्दच नाही की, त्यामधून मी तुमचे शोला प्रेम दिल्याबद्दल आभार मानू शकतो.”, असं यावेळी बीग-बी म्हणाले.

तुम्ही लोकांनी कौन बनेगा करोडपतीला पुर्नजन्म दिलाय. यासर्व गोष्टींसाठी मी देशाच्या जनतेसमोर नतमस्तक होत असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले. यावेळी बिग बी (Amitabh Bachchan) यांनी हात जोडत आणि नतमस्तक होत देशाच्या जनतेचे आभार मानले.

अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल

तसंच हा मंच तुमचा आहे…हा खेळ तुमचा आहे…हा वेळही तुमचा आहे…असंही अमिताभ बच्चन म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून उपस्थित प्रेक्षक देखील भावुक झाल्याचे दिसून आले. उपस्थित लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू निघताना देखील दिसून आले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हाच व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांकडून देखील अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये उत्कर्ष बक्षीने सर्वात फास्टेस्ट फिंगर जिंकले आणि हॉट सीटवर पोहोचला. तो 25 लाखांपर्यंत खेळला. मात्र, त्याला 25 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

News Title : Amitabh Bachchan got emotional

महत्वाच्या बातम्या-

“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”; ‘या’ खासदाराने केली भविष्यवाणी

“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले

‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’, राखी पौर्णिमेनिमित भाजपचा खास प्लॅन

या राशीच्या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवा अन्यथा…