अभिषेक-ऐश्वर्या खरंच विभक्त झाले?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चर्चेला पुन्हा उधाण

Amitabh Bachchan post in discussion

Amitabh bachchan | विश्वसुंदरी ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहे. ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. ऐश्वर्याचे अभिषेकसोबत बिनसले असून त्यांनी घटस्फोट देखील घेतलाय, इथपर्यंत या चर्चा पोहोचल्या आहेत.पाहायला गेलं तर अद्याप, दोघांनीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. मात्र, कोणत्याही कार्यक्रमात बच्चन कुटुंब (Amitabh Bachchan) आणि ऐश्वर्या नेहमीच वेगवेगळे दिसून आले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचे नाव हे अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडलं जातंय.

अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमात निम्रत हिने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती. अशात ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा संसार खरंच मोडला काय?, अशा चर्चा रंगत आहेत. अशात बिग-बी अमिताभ बच्चन यांची एक पोस्टही व्हायरल झाली आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट केली आहे.‘फार उशीर झाला आहे, त्यामुळे नंतर भेटू…’ अशी पोस्ट बिग बी यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टचा संबंध नेटकरी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्याशी जोडत आहेत. त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

दरम्यान, अभिषेकचे नाव हे निम्रत कौर हिच्यासोबत जोडण्यात आल्याने ऐश्वर्याचे चाहते चांगलेच भडकले आहेत. अभिषेकने निम्रतसाठी ऐश्वर्याची फसवणूक केल्याचा दावा एका Reddit युजरने केलाय. सोशल मीडियावर यामुळे चाहतेही वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. मधात अभिषेक आणि निम्रत कौर यांचा एका मुलाखतीमधील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे त्यांच्याबाबत असलेल्या चर्चेला आणखीच हवा मिळाली. निम्रतचे नाव अभिनेत्यासोबत जोडण्यास चाहत्यांनी सुरुवात केली. मात्र, तरीही ऐश्वर्या-अभिषेकने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. (Amitabh bachchan)

big b 2

News Title : Amitabh Bachchan post in discussion

महत्त्वाच्या बातम्या-

“काकींना नातवाचा आत्ता एवढा पुळका का..”; अजित पवारांचा प्रतिभाताई पवारांवर निशाणा

आनंदवार्ता! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त; काय आहेत सध्या किंमती?

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला मोठा दिलासा; कथित भूखंड घोटाळा केस बंद

“कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस..”; आमिर खानच्या वक्तव्याने खळबळ

राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच धक्का, विश्वासू नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .