बच्चन कुटुंबात अजूनही कोल्ड वॉर सुरूच?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट वेधलं लक्ष

Amitabh Bachchan | विश्वसुंदरी ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहे. ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. ऐश्वर्याचे अभिषेकसोबत बिनसले असून ते लवकरच विभक्त होणार आहेत, इथपर्यंत या चर्चा पोहोचल्या. पाहायला गेलं तर अद्याप, दोघांनीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. मात्र, कोणत्याही कार्यक्रमात बच्चन कुटुंब (Amitabh Bachchan) आणि ऐश्वर्या नेहमीच वेगवेगळे दिसून आले आहेत.

काही रिपोर्टमध्ये तर ऐश्वर्याने अभिषेकसोबत घटस्फोट घेतला असून ती घटस्फोटानंतर माहेरी राहायला गेल्याचं देखील म्हटलं गेलं. ऐश्वर्या ही लेक आराध्या बच्चन हीच्यासोबत वेगळं राहत असल्याचं बोललं गेलं. मात्र, यावर ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केलं नाहीये.

Amitabh Bachchan यांची पोस्ट तूफान व्हायरल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली होती.तेव्हा विमानतळावर ऐश्वर्या हीला मुलगी आराध्या सोबत स्पॉट केलं गेलं. तेव्हा अभिषेक तिच्यासोबत नव्हता. आता ऐश्वर्या राय ही विदेशातून परत आल्यानंतर सासरे अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

या पोस्टमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी एक व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. नेटकरी या पोस्टवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

ऐश्वर्या- अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, केबीसीमध्ये काम खूप वेळ सुरू असते, पण स्पर्धकांसोबतचा माझा संवाद मला भावना आणि चांगल्या मनोरंजनाने भरतो…अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावर नेटकरी मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत.

अमिताभ बच्चन इतर पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात पण घटस्फोटाबद्दल बोलत नाहीत, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.तर, काही जण बच्चन कुटुंबियांमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू नसल्यानेच यावरून दिसून येतंय, असं म्हणत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे.

News Title –  Amitabh Bachchan shared an emotional post

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसचा धोका वाढला, रूग्णसंख्या 52 वर

“सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे..”; जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं

सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या

आज शनिदेव ‘या’ राशींवर असणार मेहेरबान; मोठा धनलाभ होणार

लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात अदिती तटकरेंचं रायगड आघाडीवर!