महाराष्ट्र मुंबई

बिग बींची कोरोनावर मात, अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन हेही कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अद्याप अभिषेक बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.

माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ते घरी आराम करत आहेत, असं ट्विट अभिषेक बच्चन यांनी केलं आहे.

माझ्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी लवकरच कोरोनाला हरवून घरी परत येईल, असं ट्विट अभिषेक बच्चन यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच करणार- सौरव गांगुली

धक्कादायक! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

‘राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलंय’; ‘या’ भाजप खासदाराचा घरचा आहे

श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही- जितेंद्र आव्हाड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या