मुंबई | आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आलं नाही.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशी निमित्त चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी विठ्ठल रखुमाईचा फोटो शेअर करत छान असं कॅप्शन दिलं आहे. ‘देवषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना, वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो आणि तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते. पण यंदा करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आलं नाही.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
महत्वाच्या बातम्या-
तिथे मॅप बदलले जातायेत आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, आव्हाडांचा मोदींवर निशाणा
वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार
कोरोना लसीच्या शोधात अमेरिका आघाडीवर; केलंय हे अचाट काम