बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील पोलिसाची बदली, संपत्ती ऐकाल तर डोळेच फिरतील!

मुंबई | प्रसिद्ध हिंदी अभिनेते आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रसिद्धीच अशी आहे की सुरक्षेविना बाहेर पडूच शकत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला सतत सुरक्षारक्षकांचा गराडा आपल्याला पाहवयास मिळतो. बच्चन यांच्या सुरक्षेवर दरवर्षी काही कोटींच्या घरात खर्च होतो. त्यांचा सुरक्षारक्षक असलेल्या हेड कॉन्स्टेबलची बदली करण्यात आलेली आहे. त्या हेड कॉन्स्टेबलचं नाव जितेंद्र शिंदे असं आहे. त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका अहवालाच्या माहितीप्रमाणे अमिताभ बच्चन यांचा सुरक्षारक्षक वर्षाकाठी दीड कोटी रूपये कमावतो. जितेंद्र शिंदे गेल्या काही वर्षापासून बच्चन यांना सुरक्षा पुरवतो. तसेच जितेंद्र शिंदेची खासगी सुरक्षा कंपनी देखील आहे. जितेंद्र शिंदेची सर्व माहिती समोर येताच आता त्याची पोलीस चौकशी होणार आहे कारण, त्याने पोलीस नियमांचे उल्लंघन केलं आहे.

जितेंद्र शिंदे हा पोलीस सेवेमध्ये आहे, त्याची हेड कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती आहे. तसेच 2015 पासुन शिंदे हा बच्चन यांचा सुरक्षारक्षक आहे. चार वर्षापेक्षा जास्त वेळ कोणतीही व्यक्ती एका पदावर किंवा एका पोलीस स्टेशनला असणार नाही, असा आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढला होता. त्या नियमानूसार सध्या त्याची बदली करण्यात आली.

शिंदेला खरंच महिन्याला 12 लाख रूपये इतका पगार दिला जातो का? याची चौकशी करण्यात येणार आहे. या विषयीची सर्व माहिती अमिताभ बच्चन यांच्याकडून मागवण्यात येणार आहे. शिंदेचा पगार हा एका मोठ्या कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यापेक्षाही जास्त आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता या प्रकरणात नेमकं सत्य काय? हे लवकरच उजेडात येईल.

 

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात ‘या’ वेळेत पुन्हा संचारबंदी?, केद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना

‘बुलेटबंदी’ गाण्यावर रुग्णालयात नर्सचे ठुमके, आता मात्र सापडलीय संकटात!

डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरींची वाहन उत्पादकांना मोठी सूचना

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली?, राजकीय वर्तुळात एकच चर्चा

“आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडलेला पाहून फार वेदना होतात”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More