अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने राजकारण पेटलं; भाजप-ठाकरे गटात राडा

Amitabh Bachchan | बीग-बी अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. आता त्यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. बच्चन यांच्या पोस्टमुळे भाजप आणि ठाकरे गटात जुंपली आहे. यांच्यात आता राजकीय युद्ध सुरू झालं आहे.

अमिताभ बच्चन हे काही कामानिमित्त दक्षिण मुंबईत आले होते, त्यासाठी त्यांनी कोस्टल रोडद्वारे जुहू ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास 30 मिनिटांत केला. त्याबद्दलची पोस्ट लिहीत अमिताभ बच्चन यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. “वाह! क्या बात है! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क,कोई रुकावट नहीं ” असे लिहीत त्यांनी ही पोस्ट शेअर केली.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत

मात्र, या पोस्टने मोठा राजकीय राडा निर्माण झाला आहे. त्यांच्या या पोस्टला राजकीय वादाचा रंग चढला आहे. झालं असं की, अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला भाजप महाराष्ट्रतर्फे रिप्लाय करण्यात आला. आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… असं म्हणतं भाजपने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे आभार मानले. भाजपच्या या ट्वीटला शिवसेना ठाकरे गटाते नेते आदित्य ठाकरे यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आणि हा वाद सुरू झाला.

भाजपची पोस्ट काय?

“धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनल मधून तुम्ही प्रवास केलात याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी..”, अशी पोस्ट भाजपाकडून करण्यात आली.

आदित्य ठाकरेंनी भाजपचा दावा खोटा ठरवला

यावर पुढे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं. “कोस्टल रोड या प्रकल्पाशी भाजपचा काहीही संबंध नाही. कोस्टल रोड प्रोजेक्टची घोषणा आणि अंमलबजावणी ही उद्धव ठाकरे यांनी केली होती. भाजपचं यात काहीही योगदान नाही.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी कोस्टल रोडबद्दल माहिती देत कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम कथन केला.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट-

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पोस्टवर पुढे फडणवीस यांनीही एक ट्वीट केलं. ‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशाषन हे या सरकारचे तीन स्तंभ आहेत’ अशी प्रतिक्रीया आपल्या रिट्विट मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘मुंबई बदलतेय,आम्ही मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कसा कमी करता येईल यावर काम करत आहोत” असेही फडणवीसांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट आणि फडणवीस व ठाकरे गटात हे ट्वीटर वॉर सुरू झालं. त्यामुळे सध्या राजकारणात बीग-बी चर्चेत आले आहेत.

News Title : Amitabh Bachchan Tweet About Coastal Road Created Twitter War
महत्त्वाच्या बातम्या-

चित्रा वाघ नव्या संकटात, ‘त्या’ अभिनेत्याने समोर येऊन केली मोठी मागणी

स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी

“मला लॉक केलं आणि कपडे काढून…”, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

महत्वाची बातमी! आरोग्य विमा घेणाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का

सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस