आता कळलं की कोण आपले आणि  कोण परके, अमिताभ बच्चन

मुंबई |  “चिकित्सकांना उपचारासाठी बोलवावे लागले, आता कळलं की कोण आपले आणि  कोण परके ” असं  अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे.

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’  या आगामी चित्रपटाचे शुटींग करत असताना अमिताभ बच्चन यांची अचानक प्रकृती बिघडली होती, मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटर वरुन  दिली आहे.

 ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन बरोबर अमिर खान पण काम करणार आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.