Top News मुंबई

घरात येणाऱ्या माशांपासूनही कोरोना होऊ शकतो- अमिताभ बच्चन

Loading...

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. अशातच घरात येणाऱ्या माशांपासूनही कोरोना होऊ शकतो, असं बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशावर सध्या कोरोना विषाणूचे मोठे संकट आलं आहे. आपण सर्वांनी मिळून या संकटाला दोन हात करायचे आहे. तुम्हाला माहित आहे का?, चीनच्या तज्ञांनी सांगितलं की कोरोना विषाणू हा मानवी विष्टेवरही आठवडाभर जिवंत राहू शकतो, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

Loading...

जर त्या व्यक्तीच्या विष्टेवर एखादी माशी बसली आणि ती माशी फळ, भाज्यांवर बसली तर कोरोनाचा आजार सर्वत्र पसरु शकतो. यासाठी आपण सर्वांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येऊन स्वच्छ भारत मिशनच्या आंदोलन तयार करुन नागरिकांनी उघ्यावर शौचालय करण्यापासून रोखूया, असं आवाहनही बच्चन यांनी देशवासीयांना केलं.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये दाखवले की एक माशी कशाप्राकारे हा आजार पसरवू शकते.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

कौतूकास्पद! Parle G कंपनी पुढच्या 3आठवड्यात वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे

“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”

आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या