देश

अखेर त्याप्रकरणी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली दिलगीरी!

मुंबई |  ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने घडल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती. यानंतर बीग बी अमिताभ बच्चन यांनी देखील माफी मागावी, अशी मागणी होऊ लागली होती. मला कोणत्याही प्रकारचा अनादर करायचा नव्हता पण यामुळे भावना दुखावल्या असल्यास दिलगीर आहोत, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

केबीसी 11 मधील एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीसाठी जे काही घडले त्याचा अपमान वा अनादर करू नये. या हंगामात असे अनेक प्रश्न उद्‌भवले आहेत की ज्यांनी सर्वाना आपले नाव पूर्ण पदव्या बरोबर वापरलेले आहे. निवडीतील शीर्षक अनवधानाने वगळल्याबद्दल दिलगीर आहोत, असं ट्वीट सिद्धार्थ बसू यांनी केलं होतं. त्यांच्या ट्वीटला रिट्वीट करत अमिताभ बच्चन यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

‘केबीसी’तील बुधवारच्या भागात दुर्लक्षातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा संदर्भ दिला गेला. आम्ही या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेत आम्ही केबीसीच्या भागात खेद व्यक्त करण्यासाठी एक स्क्रोल चालवला होता, असं ट्वीट सोनी वाहिनीच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं होतं.

दरम्यान, दिलगीरी व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 

अयोध्येच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या