#MeToo | …तर मी महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेन- अमिताभ बच्चन

मुंबई | बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता विरूद्ध नाना पाटेकर वादावर अनेक लोक व्यक्त झाले. आता बीग बी म्हणजे अमिताभ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या वादावर ट्विटवर एक मुलाखत  शेअर केली आहे. 

लैंगिक शोषण होत असेल तर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करायला हवी. जर महिलांसोबत गैरवर्तन होत असेल तर मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेन’, असं बिग बींनी म्हटलं आहे.

महिलांचं लैंगिक शोषण होतं असताना आपण ते थांबविलं पाहिजे आणि अन्याय करणाऱ्यांविरोधात त्याचवेळी तक्रार दाखल केली पाहिजे.

दरम्यान, जेव्हा या घटना घडतात तेव्हाच खरं तर व्यक्त झालं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप

-बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते!

-मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही!

-#MeToo | सलमान खानने माझा मानसिक छळ केला!

-#MeToo | आमिर खानचा मोठा निर्णय; त्या व्यक्तींसोबत काम करणार नाही!