देश

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकू; अमित शहांचा इशारा

नवी दिल्ली | ‘हिंदुस्थान तेरे टुकडे हो एक हजार, इन्शाअल्लाह इन्शाहअल्लाह’ अशा संतापजनक शब्दांत जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थ्यांनी घोषणा काहीच दिवसांपूर्वी दिल्या. असे नारे देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल करत आहेत. पण जेएनयूमधे देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू, असा इशारा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे.

जबलपूमध्ये एका सभेत अमित शहा बोलत होते. 10 जानेवारीला देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या सूचनेनंतर शहा यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. ते चौथ्यांदा सीएएच्या समर्थनार्थ भाषण करत होते.

नागरिकत्व कायद्यात कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याबाबत म्हटलं नाही. असे असतानाही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मतांचे राजकारण करत आहे, असंही शहा म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आणि इतर कुणीही आणि कितीही विरोध केला तरी आम्ही पाकिस्तानातील बिगर मुस्लिमांना येथे नागरिकत्व देणारच. जे हिंदू पाकिस्तानात राहत आहेत ते कधीही हिंदुस्थानात येऊ शकतात, असं शहांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातम्या –

उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला- छत्रपती संभाजी राजे

…नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे; जयंत पाटलांचा भाजपला इशारा

रायगडावर येऊन नाक घासून माफी मागावी; धनंजय मुंडे ‘त्या’ पुस्तकावरुन आक्रमक

 

महत्त्वाच्या बातम्या –

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या