आरोग्यासाठी वरदान ठरेल आवळा ज्यूस, जाणून घ्या फायदे

Amla Juice Benefits and Recipe for Good Health

Amla Juice | विविध प्रकारची फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. फळांचा रस देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो, कारण त्यातून शरीराला अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. परंतु, अनेकांना रोज कोणत्या फळांचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे, हे माहीत नसते. या लेखात आपण आवळ्याच्या फायद्याबाबत जाऊन घेणार आहोत.

आवळ्याला (Amla) विविध फळांमध्ये खूप गुणकारी मानले जाते. आवळ्याचे (Amla) आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अनेक लोक आवळ्याचा रस पितात, पण त्याचे फायदे त्यांना माहीत नसतात. आज आपण तेच जाणून घेणार आहोत, तसेच आवळ्याचा रस कसा तयार करायचा, हे देखील पाहणार आहोत.

आवळ्याच्या रसाची कृती :

आवळ्याचा रस बनवण्यासाठी २ ते ३ आवळे (Amla) कापून घ्या. त्यातील बिया काढून टाका. अर्धा ते एक ग्लास पाण्यासोबत ते मिक्सरमध्ये बारीक करा. जेव्हा हे मिश्रण चांगले एकजीव होईल, तेव्हा ते गाळून घ्या. त्यात थोडी काळी मिरी पावडर आणि मध टाका.

आवळ्याच्या रसाचे फायदे :

हाडे मजबूत होतात

आवळ्यामध्ये (Amla) विविध जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, तसेच कॅल्शियमदेखील असते. सायन्स डायरेक्टनुसार (Science Direct), आवळ्याचा रस ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) आजारावर गुणकारी आहे. या आजारात हाडे कमकुवत होतात आणि मोडण्याचा धोका वाढतो.

त्वचा तरुण राहते

वाढत्या वयानुसार त्वचेतील कोलेजन (collagen) कमी होते, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग, कोरडेपणा, काळी वर्तुळे येतात आणि त्वचा निस्तेज होते. आवळ्यामध्ये (Amla) व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते, जे कोलेजनचे (collagen) उत्पादन वाढवते. यामुळे त्वचा तरुण आणि टवटवीत दिसते.

हृदयासाठी फायदेशीर

आवळ्याचा रस हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर असतो. काही संशोधनांनुसार, याचे सेवन केल्याने एथेरोजेनिक इंडेक्स (atherogenic index) कमी होतो. हा इंडेक्स कोलेस्ट्रॉल (cholesterol) जमा होण्याची शक्यता दर्शवतो. कोलेस्ट्रॉल (cholesterol) जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या खराब होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आवळ्याच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी (Vitamin C) अँटिऑक्सिडंटसारखे (antioxidant) काम करते. यामुळे फ्री रॅडिकल्स (free radicals), दाह कमी करणारे आणि सूक्ष्मजंतूविरोधी घटक वाढतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होते.

आवळ्याचा रस कोणी पिऊ नये? :

किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी आवळ्याच्या रसाचे सेवन करू नये, कारण त्यात व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि पोटॅशियम असते, जे किडनीसाठी चांगले नाही.

थायरॉईडच्या (thyroid) रुग्णांनी देखील आवळ्याचा रस पिणे टाळावे, कारण त्यात आयोडीन असते, जे थायरॉईडमध्ये (thyroid) हानिकारक ठरू शकते.

ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांनीही आवळ्याचा रस पिऊ नये, कारण यामुळे पोटात जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स (acid reflux) होऊ शकते.

गरोदरपणात आवळ्याच्या रसाचे सेवन टाळावे, कारण यामुळे समस्या वाढू शकतात.
शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर आवळ्याचा रस पिऊ नये, कारण यामुळे जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.

Title : Amla Juice Benefits and Recipe for Good Health

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .