मुंबई | मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे (Amol Kale) यांचं निधन झालं आहे. अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते यावेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन
अमोळ काळे याच्या अकाळी निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केलं जात आहे. तसेच अमोल काळेंच्या अचानक एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी अमोल काळे (Amol Kale) त्यांच्या सहकाऱ्यांसह न्यूयॉर्कला गेले होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदाबरोबरच अमोल काळे आंध्र प्रदेशमधल्या तिरुमला देवस्थानमचे विश्वस्तही होते.
महत्त्वाच्या बातम्या-
दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर
पुणेकरांनो सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
मुंबईत मान्सूनचं जोरदार आगमन, ‘या’ भागांना येलो अलर्ट
“स्तनांचा आकार वाढवण्यासाठी…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा
अभिनेत्रीने वयाच्या 37 व्या वर्षी संपवलं आयुष्य, पोलिसांना वेगळाच संशय!