Amol Kirtikar | मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरसीची लढत झाल्याचं दिसून आलं. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) विरूद्ध शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. यामध्ये अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) हे केवळ 48 मतांनी पराभूत झाले. मात्र हा पराभव अद्यापही ठाकरे गटाने मान्य केला नाही. अशातच आता मोठा ट्विस्ट मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी शिवसेना ठाकरे गटाने सुरू केली. त्याचवेळी या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असल्याची माहिती आता समोर आली. त्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मतमोजणीबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकाल लागला असला तरीही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. (Amol Kirtikar)
तापासात मोठा खुलासा
वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या ओटीपी ने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आली. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांनी मतमोजणी केंद्रात आपला फोन दिल्याचा आरोप केला आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला बंदी असताना हा धक्कादायक प्रकार घडला.
सीसीटीव्ही फूटेज तपासले जाणार
नेस्को सेंटरमध्ये 4 जून रोजी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी हा फोन जप्त केला. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. तसेच याप्रकरणावर आता सीसीटीव्ही फूटेज तपासले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता, हे समोर येईल. वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून स्टाँग रूम आणि एंट्री पॉईंट येथे महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फूटेज मागितले होते. त्याआधारे पोलीस पुढील तपास करणार आहे.
News Title – Amol Kirtikar And Ravindra Waykar Mumbai North East Loksabha Election Twist
महत्त्वाच्या बातम्या
“देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला”; कॉँग्रेसच्या आरोपांनी राज्यभर खळबळ
“झुंडमे कुत्ते आते है.. शेर अकेला आता आहे”; शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर राणेंच्या बॅनरने वेधलं लक्ष
ग्राहकांना फटका! सोनं महागलं, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ‘या’ योजना; अर्ज कसा करणार?
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! नाशिक-बेंगळूर विमानसेवेला मिळाला हिरवा कंदील