Lok Sabha Election Results 2024 | वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यात थेट लढत झाली होती. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. रविंद्र वायकर विजयी झाले आहेत. दोघांमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती. आता शेवटी फेरमतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला आहे.
अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यात कांटे की टक्कर
रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते.
रविंद्र वायकर विजयी
वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. ईव्हीएम मतांमध्ये अमोल किर्तीकर यांना 4 लाख 995 मते, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 994 मते मिळाली होती.
ईव्हीएममध्ये वायकर यांना अवघे एकच मत अधिक होतं. त्यानंतर 3049 पोस्टल मतांची मोजणी झाली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना 1500 तर रविंद्र वायकर यांना 1549 मते मिळाली. त्यानंतर वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी लेकाला अन् आता पत्नीला निवडून आणण्यासाठी अजितदादा ठरले सपशेल फेल
‘…म्हणून बारामतीत विजय मिळाला’; शरद पवारांनी सांगितलं कारण
ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?, जाणून घ्या सगळ्यांचा निकाल
सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी
मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय