Top News पुणे महाराष्ट्र

शंभूराजेंच्या समाधीवर माथा टेकवताच अमोल कोल्हेंना अश्रू अनावर!

Loading...

पुणे | झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या पार्श्वभूमीवर मालिकेतील सर्व कलाकारांनी संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक येथे जाऊन महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रूपेरी पडद्यावर आणण्याचं काम अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. या महिन्याच्या अखेरीस मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित होणार आहे. मालिकेचा संघर्ष कसा घडला हे सांगताना कोल्हे यांचे डोळे भरुन आले.

Loading...

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका हे व्रत आणि स्वप्न होतं ते आता पूर्ण होत आहे. आता यापुढील सर्ववेळ खासदार म्हणून मतदारसंघासाठी देणार असल्याचं कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या मालिकेतून घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खासदारकीसाठी तिकीट देण्यात आलं. त्यांनी शिरूरच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा अनपेक्षित असा पराभव केला.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील”

शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे- मुख्यमंत्री

महत्वाच्या बातम्या-

Loading...

मनसेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत- राज ठाकरे

जगात पहिला क्रमांक माझा, त्यानंतर मोदींचा; डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट

इंदुरीकरांची बदनामी करणं पडलं महागात; गुन्हा दाखल!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या