Amol Kolhe | शिरूर लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोघेही एकमेकांवर टीका करत आहेत. त्यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच आहेत. शिरूर येथील एका सभेत अजित पवारांनी अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो, असा इशारा दिला होता. याचाच कोल्हे यांनी समाचार घेतलाय.
“अजितदादा म्हणतात अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो. मला खरंच प्रश्न पडतोय की, मी जर तत्व आणि स्वाभिमान गहान टाकून मोदींची तळी उचलून धरणाऱ्या तुमच्या महायुतीच्या बाजूने सामील झालो असतो तर तुम्ही हेच बोलला असता का?”, असा प्रतिसवाल यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना केला.
‘एका शेतकऱ्याच्या मुलाला पाडायला दोन दोन उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यातली सत्ता देशातली सत्ता लावावी लागतेय. पण, माझ्यामागे पवार साहेबांचा आशीर्वाद आणि मायबाप जनता आहे.’, असा टोलाही यावेळी कोल्हे यांनी लगावला. ‘आमचा काका मामा राजकारणात नाही, हे माझं चुकलं का? की आम्ही तत्त्वाच्या, निष्ठेच्या बाजूला उभे राहिलो आणि स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकला नाही, हे माझं चुकलं?’, असा प्रश्न करत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना टार्गेट केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरटणाऱ्यांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होत. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल.”, अशा शब्दांत कोल्हे यांनी अजित पवार यांना आव्हान दिलं आहे.
‘दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं’
‘दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं’, हा आमचा बाणा आहे. ज्या भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात. अशी जहरी टीका यावेळी कोल्हे यांनी केली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला 12 सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझं काम बोलतं, म्हणून इथं अडकून पडावं लागलं, असा टोला देखील कोल्हे(Amol Kolhe ) यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी दादांना विनम्रतेने सांगतो, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला तर तो आपल्या जिवासाठी प्रतिहल्ला करतं. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तर त्याची तयारी ठेवा.”,असा इशाराच अमोल कोल्हे यांनी दिला.
“..मी तर शिवसिंहाची औलाद, थांबणार नाही”
यावेळी त्यांनी बिबट्याचा प्रश्न देखील समोर आणला. प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या. बिबट्याचा प्रश्न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्न झाला आहे.असं म्हणत अमोल कोल्हे यांनी बिबट्याच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचं लक्ष्य वेधलं. आता अमोल कोल्हे यांच्या या आव्हानाला अजित पवार काय प्रत्युत्तर देतात, ते पाहावं लागेल. दरम्यान, शिरूर येथे अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांना महायुतीकडून अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आव्हान असणार आहे.
News Title – Amol Kolhe challenge to Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
सुवर्णसंधी! बिग डिस्कॉउंटसह खरेदी करा ‘हा’ तगडा स्मार्टफोन
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार कांटे की टक्कर; जनतेचा कौल कोणाला?
आज या दोन राशींचे नशीब चमकणार; होणार मालामाल
‘स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, तुम्ही…’; बजरंग सोनवणेंनी केली अजित पवारांची बोलती बंद
“बडे नेते जेलमध्ये जाणार”; अरविंद केजरीवालांच्या दाव्यामुळे खळबळ