मुंबई | झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. त्यावर अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी महाराजांच्या हत्येचा भाग वगळला असल्याचं आश्वासन दिलं, अशी माहितीही अर्जुन खोतकर यांनी दिली होती. त्यावर अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा कोणताही भाग वगळणार असं कोणतही आश्वासन मी दिलं नाही. मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही याबाबत निर्माते नाही तर झी वाहिनी निर्णय घेते, असं अमोल कोल्हेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
मालिकेचं चित्रीकरण आधीचं पूर्ण झालं आहे. आवश्यक ती खबरदारी मालिकेच्या चित्रीकरणापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे चिंता करु नये असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे कोणतंही चूकीचं वृत्त प्रसारित केलं जाऊ नये अशी माझी विनंती आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, मालिकेबाबत कोणतंच आश्वासन दिलं नसल्याचं अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला
“फडणवीस दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा”
महत्वाच्या बातम्या-
वारिस पठाणांचं शीर कलम करणाऱ्याला 11 लाखांचं बक्षिस; मुस्लीम संघटनेची घोषणा
राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय अन् मी 80 व्या, या वयात आपण थांबायचं…- शरद पवार
वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Comments are closed.