बारामती | आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी यात्रा काढण्याऐवजी सत्ता आल्यानंतर काढायला हवी होती. त्यानिमित्तानं कामं काय करायची ते समजलं असतं, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यावर अमोल कोल्हेंनी बारामतीत बोलताना टीका केली आहे.
मध्यंतरी ही यात्रा काढली असती तर कामाचं मुल्यांकन करता आलं असतं, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आघाडीचे नेते युतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवर बोलताना भाजपचे नेते फक्त वावड्या उठवतायेत. प्रत्यक्ष नावं मात्र जाहिर करत नाहीत, असं कोल्हे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-शिला दीक्षित यांचं जाणं उद्ध्वस्त करणारं; राहुल गांधींना शोक अनावर
-युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री???; आदित्य ठाकरे म्हणतात…
-दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं निधन
-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं
Comments are closed.