बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर…”

मुंबई | आपला देश सध्या भयानक परिस्थितीशी झुंजत आहे. देशातील आरोग्याची पायाभूत सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. भारताला सध्या नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटर, आरोग्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण साधनसामग्री यांची जास्त आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात काही ट्विट केले आहेत.

देशात दररोज 2 लाखांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर दररोज 1500 लोक आपल्या जवळच्या माणसाला गमावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्राधान्याने नेमकं कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करावे याबाबत ठरवावे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाने MPLAD निधी जाहीर करावे, जेणेकरुन खासदारांना आपापल्या मतदारसंघात आवश्यक उपाययोजना उभारण्यासाठी त्याचा वापर करता येईल, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे.

दररोज 1500 पेक्षा जास्त रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या बांधकामावर पैसे खर्च करण्याआधी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला प्राधान्य द्यावं, असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय.

देशात सध्या आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची जास्त आवश्यकता असल्याचं मत मांडलं आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारने खासदार कोट्यातील निधींची पूर्तता करावी, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“मोदींचं भाषण म्हणजे थाळी, टाळी वाजवा, दिवे लावा प्रकारातलं”

अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक विजय

बाद की नाबाद?, पंचांनी दिलेल्या निर्णयावर क्रीडाप्रेमी नाराज

“देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं असेल तर….”; नरेंद्र मोदींनी राज्यांना केलं हे आवाहन

जगात सर्वाधिक वेगाने लसीकरण हे भारतात होत आहे- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More