पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

आता कुणावर गुन्हा दाखल करणार?; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अहमदनगर |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र गेल्या 5 वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता कुणावर गुन्हा दाखल करायचा?, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार घनशाम शेलार यांच्या प्रचारार्थ बेलवंडी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हेंनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून अमोल कोल्हेंनी सरकारला धारेवर धरलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सरकार जाणार हे लक्षात येताच नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सभा आयोजित केल्या. पण हे मस्तावलेल्या मंडळींचा कडेलोट केल्याशिवाय सोडणार नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, घनश्याम शेलार हे सत्ता नसताना 35 वर्षांपासून लोकांसाठी झटत आहेत. त्यामुळे निश्चितच श्रीगोंद्याच्या आखाडय़ात शाहू फुले विचारांचा विजय होणार आणि शेलार आमदार होणार असा विश्वास कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या