बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशीर्वाद आहे”

पुणे | पुणे-नाशिक महामार्गावरील खेडच्या बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. अमोल कोल्हे हे या बायपासचे उद्घाटन करण्यापूर्वीच आदल्या दिवशी आढळराव पाटील यांनी या रस्त्याचे उद्घाटन करून तो लोकांसाठी खुला केला.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील व अमोल कोल्हे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. त्यातच या उद्घाटनावरून या वादात ठिणगी पडल्याने ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे’, असं खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सध्या सत्तेत आहेत. पण सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कुरबुरी गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत असताना पाहायला मिळत आहेत. त्यातच अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नियोजित वेळेप्रमाणे खेडच्या बायपास रस्त्याचे उद्घाटन पुन्हा एकदा करून त्याचे लोकार्पण केले. तसेच शिवाजीराव आढळराव पाटील आढळराव पाटील यांनी हा रस्ता मी खासदार असताना नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बनवला असून अमोल कोल्हे यांनी विनाकारण त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असं उद्घाटनप्रसंगी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More