“अमोल कोल्हेंना दाढी काढली तर कोणी ओळखतं का?”

मुंबई | एका कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका केली होती.

नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना 24 ला आपटून टाकू असं म्हणत पैसे घेऊन रोल करतो असे म्हणत दाढी काढली तर कोणी ओळखतं का अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांची उंचीच काढली आहे.

कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहे? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? भाजपचं राणेंना किंमत देत नाही, जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, बोलतांना संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा असा टोलाच कोल्हे यांनी लगावला आहे. 

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, महाराष्ट्रच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-