बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काही चुकलं असेल तर माफ करा; अमोल कोल्हे भावूक

मुंबई | गेल्या 2 वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी झी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे भावूक झाल्याचं आणखी एकदा पाहायला मिळालं आहे.

मालिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हेंना अश्रू अनावर झाले. खरंतर काय बोलू हेच समजत नाही. पहिल्यांदाच अडखळलो असेन. पण एक स्वप्नपूर्ती आहे. सगळ्या टीमचे आभार मानतो. कारण गेली 8-9 वर्षे आम्ही धडपडत होतो. झी मराठीचे आभार. छत्रपती शंभू महाराजांचा धगधगता इतिहास सांगण्याची संधी दिली, असं सांगताना अमोल कोल्हेंना आपल्या अश्रूंचा बांध फुटला.

काही राहून गेलं असेल तर जिवात जीव असेपर्यंत ते पूर्ण करण्याआधी कायम कटीबद्ध राहीन. सगळेच्या सगळं यश हे साडे तीनशे वर्षे आपल्या काळजात छत्रपती संभाजी महाराजांना जपून ठेवलं त्या महाराष्ट्रातल्या सर्व शंभूभक्तांच्या ओंझळीत टाकतो, असं म्हणत त्यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांचे तसेच प्रेक्षकांचे आभार मानले.

दरम्यान, मलिकेतील सर्व कलाकारांनी वडू बुद्रुक गावातील महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे भावूक झाले. महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत असतानाही अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग बातम्या-

“भुंकणारे भुंकत राहतील पण आपण आपलं कीर्तन बंद करु नका”

कीर्तन-प्रवचन सोडणार?; अखेर इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

“दुसर्‍याला बावळट म्हणता आपला बावळटपणा सगळ्यांना दिसतोय”

वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते- छगन भुजबळ

आबांनी कधीच कुणाचं मन दुखावलं नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More