मुंबई | गेले अनेक दिवस प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ शेवटाकडे जात असताना कालच्या भागात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सरदारानं बंदी बनवलं. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट क्षण ठरला. याचाच प्रत्यय संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या खासदार अभिनेते अमोल कोल्हेंना आला. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.
आज मतदार संघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला….नाहीतर ते तुम्हाला पकडतील…मी निश:ब्द….कृतकृत्य, अशी भावूक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे.
चिमुरडीच्या बोलण्यानं लक्षात येत की कोल्हेंनी साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली आहे. कोल्हेंनीही महाराजांची भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य किती लिलया पेललं हे चिमुरडीच्या बोलण्यातून अधोरेखित होतं.
दुसरीकडे कोल्हेंनी भावूक पोस्ट केल्यानंतर रसिक प्रेक्षकांच्या कमेंटसचा पाऊस पडला आहे. प्रेक्षकदेखील मालिका बघताना भावूक झाले आहेत. आमच्या मनातील भावनाच त्या चिमुरडीने तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असं त्यांनी कमेंटसच्या माध्यमातून सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी
उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री…- शरद पवार
महत्वाच्या बातम्या-
थोरातांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?
आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई बनले ब्रिटनचे अर्थमंत्री!
Comments are closed.