Top News

अमोल कोल्हेंचा मोठा सस्पेन्स; 18 डिसेंबरला याबाबत करणार मोठी घोषणा

मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार असल्याचं अमोल कोल्हेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अमोल कोल्हेंनी पोस्टच्या  बॅकग्राऊंडला भगवा रंग ठेवला आहे. यामुळे अनेक जणांनी कमेंट करत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.

अमोल कोल्हेंनी 8 तासांपूर्वी ही पोस्ट टाकली आहे. A Big Announcement On 18 th December, असं अमोल कोल्हेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. काही जणांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा असेल, असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, येत्या 18 डिसेंबरला खासदार अमोल कोल्हे नक्की कोणती घोषणा करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या