बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंनी धरला ठेका; व्हिडीओ तुफान व्हायरल

पुणे | राज्यात सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक राजकीय मंडळी आपल्या भागातील विवाहांना आवर्जून हजेरी लावत असतात. अनेक नेत्यांना ठेका धरतांना तुम्ही पाहिलं असेल. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगावमधील विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अमोल कोल्हे यांनी ठेका धरलेला पहायला मिळालं.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या लग्नाला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अमोल कोल्हे यांनी हलगीच्या तालावर डान्स केला आहे.

अमोल कोल्हे यांनी नोटा ओवाळून हलगी वादकांना दिल्या आहेत. अमोल कोल्हेंचा हलगीच्या तालावर थिरकल्याचा  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अमोल कोल्हे यांचा हा भन्नाट डान्स अनेक तरूणांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोल्हेंच्या या डान्स व्हिडिओवर अनेक लाईक्स, कमेंट्स येत आहेत. तसेच डान्स सुरू असताना उपस्थित युवक सेल्फी घेताना देखील दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ- 

थोडक्यात बातम्या- 

“आयत्या बिळात नागोबा”, प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

“राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे बनायचंय म्हणून…”

“…तर आम्ही इथवर पोहोचलोच नसतो”; ज्येष्ठ दिग्दर्शकाची भावूक पोस्ट

देशाच्या राजकारणात खळबळ! शरद पवारांच्या पुढाकाराने मुंबईत मोठी बैठक होणार

“हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत अन्…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More