Amol Kolhe | आज (09) ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. शिवनेरी गडावर शेकडो कार्यकर्ते देखील हजर होते. शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. शिवनेरी गडाच्या पायथ्याजवळ एक मोठा आपघात टळला.
नेमकं काय घडलं?
शिवस्वराज्य यात्रा सुरु झाली आहे. दरम्यान यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्राॅली एकाच बाजूली कलंडली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.
क्रेनच्या ट्राॅलीमध्ये बिघाड-
शिवाजी महाराज यांच्या पुताळ्याची उंची वर होती, त्यामुळे महाराजांच्या पुताळ्याला पुष्पहार घालण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने उंचावर चढून पुष्पहार घातला. मात्र, पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली आणि यावेळी चौघही एका बाजूला कलांडले आणि मोठा आपाघात टळला. दरम्यान, क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे क्रेनची ट्राॅली एका बाजूने कलांडली असं समोर आला आहे.
कोणता ही इव्हेंट नाही-
माध्यमांशी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, आमची यात्रा ही अत्यंत साधी आहे, आमचा काही इव्हेंट नाहीये. आम्हाला जनतेच्या मनातले प्रश्न जाणून घ्यायचे आहेत, त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा मिळतोय, अशा शब्दात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर जयंत पाटलांनी टिका केली.
News Title : Amol kolhe & jayant patil crane accident
महत्त्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ऐश्वर्याला सोडून चक्क..
“ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला”
Animal चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘तो’ डिलीटेड सीन तूफान व्हायरल!
ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव
“विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत”; संजय राऊतांचा गंभीर आरोप