नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील मर्दानी खेळ म्हणून सर्वत्र परिचीत असलेली बैलगाडा शर्यत. ग्रामीण जीवनात शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे पिढीजात बैलसंवर्धनाचा वारसा आहे. हा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आजही सुरू आहे. बैल हा फक्त प्राणी नसुन शेतकऱ्यांसाठी तो आपल्या घरातील सदस्य असतो.
केंद्र सरकारने बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांमध्ये केला असल्याने बैलगाडा शर्यतींवर बंदी आली आहे. ही बंदी उठवून ग्रामीण भागातील संस्कृतीचं रक्षण करण्यात यावं यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. यातच आता शिरूर मतदारसंघाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांची भेट घेतली आहे.
ग्रामीण जीवनावर कायम प्रभाव पाडणारी ही बाब असल्याने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. माजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून केलेल्या पाठपुराव्यांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती आणि याबाबत पुढील कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना पण केली होती.
एकंदरीत सर्व माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. खूप मोठा वारसा असलेला हा परंपरागत खेळ सुरू होऊन ग्रामीण जीवनात आनंद यावा यासाठी अमोल कोल्हे यांनी मंत्री महोद्यांना शेतकरी बैलांची कशी काळजी घेतात याचे काही व्हाडीओ दाखवले आणि लवकरच योग्य निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
थोडक्यात बातम्या
नोकरदारांसाठी गुड न्यूज; एकाच वेळी खात्यावर मोठी रक्कम जमा
शरद पवारांकडून अमित शहांना खास निमंत्रण; लवकरच अमित शहांचा पुणे दौरा
अबब! प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची किंमत ऐकून थक्क व्हाल
गरीब घरातला श्रीमंत माणूस; नाव न सांगण्याच्या अटीवर पांडुरंगाचरणी 1 कोटींचं दान!
’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना
Comments are closed.