महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 सोलापूर

पराभव रणात नाही तर मनात होतो- अमोल कोल्हे

Loading...

बार्शी | कोणत्या पक्षावर बोलावं हे बार्शीत येण्याआधीच बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो, पराभव रणात नाही तर मनात होतो म्हणून विरोधकांनी पक्ष बदलला, असं राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे यांची वैराग इथे प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

सरकारकडे महिला धोरण नाही. या सरकारच्या काळातच बलात्कार जास्त झाले. मुख्यमंत्री गृहमंत्री पद संभाळण्यास असमर्थ ठरलं आहेत, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. दल बदलूंना घरचा रस्ता दाखवा, आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केलं.

Loading...

आघाडीचं सरकार सत्तेत येताच 3 महिन्यात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू.  केजी टू पीजीपर्यंतचं शिक्षण मोफत देऊ. उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज देवू. ही निवडणूक दोन विचारांची, तरुणांची आणि महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची आणि राज्यात आघाडीचीच सरकार सत्ता येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या